Home उतर महाराष्ट्र नगरपालिकेच्या छोट्या मोठ्या सर्व पाईपलाईनची तपासणी करून श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी द्या...

नगरपालिकेच्या छोट्या मोठ्या सर्व पाईपलाईनची तपासणी करून श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी द्या या मागणीसाठी १ जुलै रोजी भव्य निदर्शने

123

आशाताई बच्छाव

1001642397.jpg

नगरपालिकेच्या छोट्या मोठ्या सर्व पाईपलाईनची तपासणी करून श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी द्या या मागणीसाठी १ जुलै रोजी भव्य निदर्शने
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –श्रीरामपूर शहरातील सर्व छोट्या मोठ्या पाणी येणाऱ्या जाणाऱ्या पाईपलाईनची तपासणी करावी तसेच विविध मागण्यासाठी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करणार असल्याची माहिती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिली आहे तसे निवेदन उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे यांना शिवसेनेचे नेते संजय छल्लारे मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड मा. नगरसेवक दीपक कुऱ्हाडे शेतकरी संघटनेचे डॉ. रोहित कुलकर्णी यांना दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही श्रीरामपूर शहरातील रहिवासी असून नगरपरिषदेचे करदाते आहोत आम्ही आजपर्यंत श्रीरामपूर नगर परिषदेवर डोळे झाकून भरोसा ठेवून लहान थोर सर्व श्रीरामपूरकर नगरपरिषदेचे पिण्याचे पाणी पीत आहे त्याच तलावात पाणी जाणाऱ्या पाईपलाईन वर किळसवाणा व संताप जनक प्रकार घडलेला आहे त्यामुळे नगरपालिकेचे पाणी पिण्यासंदर्भात श्रीरामपूरकरांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊन श्रीरामपूरातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या असून तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या मेन लाईन वर शौचालयचा मैला सोडण्यात आला होता त्या नीच प्रवृत्तीच्या कुटुंबावर श्रीरामपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद देऊन गुन्हे दाखल केले आहे परंतु त्यांनी केलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक लोक आजारी पडून गंभीर स्वरूपाचे आजार झाले आहे म्हणून तज्ञ डॉ. बोलून श्रीरामपूर शहरातील सर्व लहान पासून ते वृद्ध लोकांची मोफत आरोग्य तपासणी नगरपरिषदेने करावी तसेच श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव रामभरोसे आहे त्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून तलावाच्या ठिकाणी सीसी कॅमेरे लावून त्या ठिकाणी श्रीरामपूर नगर परिषदेने २४ तास वॉचमनचा पहारा द्यावा व पाटामध्ये दूषित सांडपाणी कचरा मैला टाकणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करावा तसेच श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या छोट्या-मोठ्या पाईपलाईनची पाणीपुरवठा विभागामार्फत त्वरित कसून तपासणी करून श्रीरामपूर शहराला दूषित व हागणदारीमुक्त शुद्ध पाणी देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे तरी या निदर्शनाला श्रीरामपूर शहरातील ज्यांना दूषित पाणी येत असेल अशा नागरिकांनी पाण्याच्या बॉटल भरून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांनी केले आहे

Previous articleवाशिममध्ये गढूळ आणि गाळ सदृश्य पाणीपुरवठा : नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ; जबाबदार कोण?
Next articleछावा युवा संघटनच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.