आशाताई बच्छाव
वाशिममध्ये गढूळ आणि गाळ सदृश्य पाणीपुरवठा : नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ; जबाबदार कोण?
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –शहरात नगर पालिकेकडून आज तब्बल तेराव्या दिवशी गढूळ आणि गाळ सदृश्य पाणी पुरवठा करण्यात आलं आहे. या पाण्यात इतका गाळ व अशुद्धता आहे की, ते पिण्यायोग्य तर दूरच, घरगुती वापरासाठीही धोकादायक बनले आहे.यामुळे आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आज वाशिम नगर पालिकेकडून गणेश पेठ ,गोपाल टॉकीज आणि इतरही भागात 13व्या दिवशी गढूळ आणि गाळ सदृश्य पाणी पूरवठा करण्यात आलं आहे.हे पाणी पिल्यास नागरिकांना घशाचे इन्फेक्शन, पोटदुखी, उलट्या व जुलाब यांसारख्या समस्या भोगायला लागणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी करणारी नगर पालिकेची यंत्रणा नक्की कुठे आहे ? असा संतप्त सवाल वाशीम शहरवासीयांकडून विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई, अपुरा पाणी शुद्धीकरण आणि जलवाहिनीतील गाळ यामुळे पाणीपुरवठा निकृष्ट दर्जाचा होत असल्याची तक्रारी सातत्याने केली जात आहे. मात्र तरीही नगर पालिका प्रशासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.आज केलेला पाणी पुरवठा गढूळ आणि गाळ सदृश्य असून हे पाणी पिवुन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न देखील वाशीम शहर वासियांकडून कडून विचारला जात आहे.मात्र आता तरी वाशीम नगर पालिका याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.






