आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील कार्यालयात आ.नवघरे व तहसीलदार यांच्या हस्ते शेतकरी अपघात वारसांना विमा संरक्षण लाभ
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील कार्यालय येथे आज दिनांक रोजी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा वारसांना के.गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान वाटप वसमत विधानसभेचे लोक आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा वारसांना गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून अनुदान वाटप करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी माननीय वसमत तहसीलज् चे तहसीलदार श्रीमती शारदा दळवी,श्री एस बी भिसे , तालुका कृषी अधिकारी, ए बी सोळंके मंडळ कृषी अधिकारी,हट्टा,श्री पी के माने मंडळ कृषी अधिकारी तहसिल कार्यालय वसमत येथे उपस्थित होते वसमत तालुक्यातील,स्व गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना सर्व लाभार्थी शेतकरी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी कुषी विमा पात्रं लाभार्थी याना आर्थिक मदतीसाठी ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
शेती करत असताना होणारे अपघात, नैसर्गिक आपत्ती, रस्ते किंवा वाहन अपघात, विषबाधा यांसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व येत असल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबवली जाते. या योजने अंतर्गत 2024 25 वर्षात वसमत तालुक्यातील ३८ शेतकरी कुटुंबांच्या वारसांना एकूण ७५ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत पात्रता निकष
-राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांचे आई-वडील, पत्नी व पती, मुले किंवा अविवाहित मुलगी (वयोगट 10 ते 75 वर्षांपर्यंत) यांपैकी कोणताही एक सदस्य पात्र असतो.अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व (दोन्ही डोळे,हात, पाय निकामी): 2 लाख रुपये
– एक डोळा, हात, पाय निकामी: 1 लाख रुपये
-अपघाताच्या 30 दिवसांच्या आत अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक असते.रस्ता किंवा रेल्वे अपघात, विषबाधा, विजेचा शॉक किंवा वीज पडून मृत्यू, जनावरांचा हल्ला, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, दंगल किंवा खून, योजना लागू नसलेली प्रकरणे, नैसर्गिक मृत्यू, जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणे, कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली अपघात, मोटारशर्यतीमधील अपघात, भ्रमिष्टपणा, अंतर्गत रक्तस्राव, जवळच्या व्यक्तीने केलेला खून या कारणांमुळे मदत मिळू शकते आवश्यक कागदपत्रे अशी.विहीत नमुन्यातील अर्ज
7/12 उतारा मृत्यू प्रमाणपत्र
वारस नोंद (गाव नमुना 6)
वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र)
प्रथम माहिती अहवाल (FIR), स्थळ पंचनामा
पोलीस पाटील यांचा अहवाल
अपघातासंबंधित सर्व पुरावे व कागदपत्रे संबंधित शेतकरी किंवा वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो. अर्ज प्रक्रियेसाठी सहाय्यक, कृषी अधिकारी.उपकृषी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी याबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतात मार्गदर्शन करतात.






