Home उतर महाराष्ट्र शिंदखेड्यात छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौका पर्यंत स्त्याची दुरावस्था

शिंदखेड्यात छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौका पर्यंत स्त्याची दुरावस्था

187

आशाताई बच्छाव

1001641343.jpg

शिंदखेड्यात छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौका पर्यंत स्त्याची दुरावस्था

!! शिंदखेडा शहरातील युवकांनी केली रस्ता दुरुस्तीची मागणी !!

(विरदेल/शिंदखेडा प्रतिनिधी)
(राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा जि,धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून काँक्रेट मधून लोखंडी सळ्यां बाहेर आल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत आहे. सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धुळे यांच्या कडे केली असून निवेदन उपविभागीय अभियंता यांना दिले आहे सदर निवेदन स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांनी स्वीकारले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक हा शहराचा मुख्य आणि वर्दळीचा रस्ता आहे. शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, बस स्थानक, बाजारपेठ, न्यायालय हे सर्व रस्त्याला लागून आहेत. परंतु अनेक वर्षांपासून सदर रस्ता दुर्लक्षित होत आहे. आता तर रस्त्याची अवस्था अत्यन्त बिकट झाली असून पायी चालणे देखील जिकरीचे झाले आहे. सदर रस्त्याचे काम त्वरित आणि दर्जेदार करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परीणामास पुर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. असा इशारा निवेदणातून देण्यात आला आहे. निवेदनावर रोहित पाटील, राजेंद्र मराठे, भूषण पवार, जीवन देशमुख, बबलू खाटीक, अबरार तेली यांच्या सह्या आहेत.

Previous articleपंढरपूर येथे ७ जुलै रोजी वारकरी पुरस्कार वितरण यंदाचे मानाचे व सन्मानाचे वारकरी पुरस्कार जाहीर
Next articleनिजामपूर नंदुरबार मार्गावर टिटाणेतील एकाचा अपघातात दूर्दैवी मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.