आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ –आज, जून २६ , २०२५ रोजी, दुपारी एक वाजेच्या सुमारास. निजामपूर, ते नंदुरबार टिटाणे फाटा जवळ साई दरबार हॉटेल च्या पुढे येथे एक अपघात झाला. या अपघातात, मोटर सायकल स्वार कैलाश निंबा माळचे . वय ३५ वर्ष या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू या रस्त्याने कायम भरधाव वेगाने अवैद्य वाहतूक करणारे ट्रक डंपर यांची खूप मोठ्या प्रमाणात दहशत या रस्त्याला लागून असलेल्या गावाच्या नागरिकांमध्ये झालेली असून यांच्यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न संपूर्ण परिसरातून होत आहे रस्त्यालगत असलेल्या गावांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे प्रशासनाने रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करून. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर ट्रक. यांच्यामुळेच बरेच अपघात होत असून. मोटर सायकल स्वार कैलास निंबा माळचे राहणार. टिटाणे ता. साक्री जिल्हा धुळे या व्यक्तीचा अपघाताला कारणीभूत अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रक याच्यामुळेच झालेला आहे असे प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे. आणि दुसरे कारण म्हणजे रस्त्याचे सुरू असलेले काम खूपच संत गतीने व धोकेदायक वळणावर सुरू असलेले काम आणि त्या ठिकाणी कुठलाही सुरक्षित पर्यायी मार्ग ठेवलेला नाही या कारणानेच अनेक अपघात होत आहेत. निजामपूर तर टिटाणे फाटा या रस्त्यालगत अपघातांची मालिका सुरूच आहे. आणि प्रशासन याची कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे कारवाई नाही झाल्यास यांची तक्रार वरिष्ठांकडे जाऊन करू अशा इशारा त्यांनी दिलेला आहे. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा या परिसरात असलेले भीतीचे वातावरण व व होत असलेली कोंडी यातून मुक्तता करावी अशी या परिसराची मागणी वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व पीडित परिवारांना न्याय द्यावा. व भरधाव वेगाने चालणाऱ्या वाळूच्या ट्रक व डंपर यांच्यामुळेच अनेक अपघात होत आहेत असे बरेच अपघातात वाळूचे ट्रक व डंपर कारणीभूत ठरत आहेत यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रतिनिधीशी बोलताना. स्थानिकांनी केलेली आहे.






