आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुटखेडा येथे योगा दीन साजरा
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 21/06/2025 शनिवार रोजी जागतिक योग दिनानिमित्त स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय या ठिकाणी सकाळी आठ वाजता योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गासाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री दत्तात्रय नागरे ,योगशिक्षक, विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी एक तास वीस मिनिट योग वर्ग घेतला व त्या वर्गामध्ये पूरक व्यायाम सूर्यनमस्कार वेगवेगळी असणे प्राणायाम शवासन इत्यादी व्यायाम प्रकार विद्यार्थ्यांना सांगितले स्वतः केले त्याची माहिती दिली .त्याचे फायदे सांगितले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले विद्यार्थ्यांनी सुद्धा आनंदाने सर्व व्यायाम प्रकार केले .प्राचार्य शिक्षक वृंद या योग शिबिरात सहभागी झाले नागरे सरांनी विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले .फार हुशार मुलं मुली आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे योग केले व मला फार आनंद झाला अशी प्रतिक्रिया सरांनी दिली सरांचे हे तिसरे वर्ष आहे. तीन वर्षा पासून सर योग वर्ग घेत .आहे प्राचार्य अशोक बनकर यांनी नागरे सरांचे सुरुवातीलाच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व योग वर्ग संपल्यानंतर त्यांचे आभार मानले व योग वर्ग संपन्न झाला.