Home नांदेड घरकुल लाभार्थ्यांची लुबाडणूक थांबवा, अन्यथा “भीक मांगो आंदोलन” – शिवसेनेचा इशारा.

घरकुल लाभार्थ्यांची लुबाडणूक थांबवा, अन्यथा “भीक मांगो आंदोलन” – शिवसेनेचा इशारा.

89

आशाताई बच्छाव

1001623096.jpg

घरकुल लाभार्थ्यांची लुबाडणूक थांबवा, अन्यथा “भीक मांगो आंदोलन” – शिवसेनेचा इशारा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर तालुक्यातील घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार थांबवावेत, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि “भीक मांगो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी माळेगावकर आणि पोलिस निरीक्षक मुंढे यांना निवेदनही देण्यात आले.

शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे की, देगलूर तालुक्यातील जवळपास ११ हजार घरकुल लाभार्थ्यांचे बिले तयार करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून घराचे फोटो घेतल्यानंतर दहा ते पंधरा हजार रुपये लाच मागितली जात आहे. ही लूट गंभीर असून गरीब लाभार्थ्यांची खुलेआम लुबाडणूक सुरू आहे. याशिवाय, सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ते यांसारख्या मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्येही संबंधित विभागातील कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आणि तालुकाप्रमुख बालाजी इंगळे पाटील खुतमापुरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर ३० जून रोजी पंचायत समिती कार्यालय देगलूर येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यात “भीक मांगो आंदोलन” ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवेदनप्रसंगी खुतमापुरचे सरपंच बालाजी चोपडे, विभागप्रमुख व माजी सरपंच राजू उल्लेवार (मुजळगे), कावळगड्डा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, शाखाप्रमुख शिवाजी जाधव पाटील, सरपंच मा. आकाश गजले, युवा नेते मा. योगेश पाटील (कावळगड्डा), शिवाजी सोनकांबळे (मुजळगा) यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास शिवसेना सज्ज असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Previous article“विजेचा खेळ थांबवा, गाठ माझ्याशी आहे!” — आ. अंतापूरकरांचा महावितरणला इशारा
Next articleखेरवाडी येथे स्व.बाळासाहेब गणपत पाटील आवारे ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.