Home बुलढाणा BREAKING अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयाला लाभले कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक ! –...

BREAKING अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयाला लाभले कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक ! – लातूरचे डॉ. दत्तात्रय बिराजदार सांभाळणार

256

आशाताई बच्छाव

1001580950.jpg

BREAKING अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयाला लाभले कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक ! – लातूरचे डॉ. दत्तात्रय बिराजदार सांभाळणार बुलढाण्याचा पदभार !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जवळपास दोन वर्षापासून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक नव्हते. त्यामुळे या पदाचा पदभार डॉ. भागवत भुसारी यांनी प्रभारी म्हणून पाहिला. परंतू आता मात्र लातूरचे डॉ. दत्तात्रय बिराजदार बुलढाण्याचा पदभार सांभाळणार आहेत. डॉ. बिराजदार यांच्या विनंतीवरून त्यांना सदर पदस्थापना देण्याचा आदेश आरोग्य विभागाकडून धडकला आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कार्यभार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी योग्यरीत्या सांभाळला. आता मात्र लातूर जिल्ह्यातील बागळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकडॉ. दत्तात्रय बिराजदार यांची येथे पदस्थापना झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीत रुग्णसेवा अधिक चांगली व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous articleधूम! विधी संघर्षीत बालकाने 5 दुचाकी चोरल्या! – एलसीबीने घेतले -त्याला ताब्यात
Next articleस्व. पंकज देशमूख मृत्यू प्रकरण पेटले ! सर्वपक्षीय सभेत सीआयडी चौकशीची मागणी ! – मलकापूर एसडीओं कडे चौकशीचे आदेश!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.