Home बुलढाणा मोताळा ते मलकापूर मार्गावरील घटना; अपघातात ऑटो चालक जखमी एसटी बस-ऑटोची समोरासमोर...

मोताळा ते मलकापूर मार्गावरील घटना; अपघातात ऑटो चालक जखमी एसटी बस-ऑटोची समोरासमोर धडक

124

आशाताई बच्छाव

1001580935.jpg

मोताळा ते मलकापूर मार्गावरील घटना; अपघातात ऑटो चालक जखमी
एसटी बस-ऑटोची समोरासमोर धडक
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा मोताळा ते मलकापूर जाणारी एसटीप बस आणी ऑटोची समोरासमोर धडक झाल्याची घटना ६ जून रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारासम बस स्टँडपासून काही अंतरावर मलकापूर मार्गावर दुध डेअरीसमोर घडली. या घटनेत ऑटो चालक जखमी झाला असून उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे.

मलकापूर डेपोची एम.एच. ४० ए.क्यू. ६३९१ क्रमांकाची बस मोताळा येथून प्रवासी घेऊन मलकापूरसाठी निघाली होती. दरम्यान, मलकापूर मार्गावर काही अंतरावर गेल्यावर एका दूध डेअरीजवळ समोरून येणाऱ्या एम.एच. २८ एच. ४०६८ क्रमांकाच्या ऑटो आणि बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटो चालकाच्या डोक्याला आणि मानेवर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे पोहेकॉ नंदकिशोर धांडे, रवींद्र नरोटे, श्रीकांत चिंचोले, चालक मनोहर पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमी ऑटो चालकाला नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी बुलढाणा येथे हलवले.

Previous articleजय शिवराय ग्रुप आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
Next articleधूम! विधी संघर्षीत बालकाने 5 दुचाकी चोरल्या! – एलसीबीने घेतले -त्याला ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.