Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा येथे कल्पतरू सीएमआरसी मार्फत सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

शिंदखेडा येथे कल्पतरू सीएमआरसी मार्फत सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

161

आशाताई बच्छाव

1001571477.jpg

शिंदखेडा येथे कल्पतरू सीएमआरसी मार्फत सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

(विरदेल शिंदखेडा प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा येथील कल्पतरू सीएमआरसी कार्यालयात सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन, महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे व कल्पतरू लोकसंचालित साधन केंद्र शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारक सन्मान सोहळा शिंदखेडा येथे संपन्न झाला. महिला सक्षमीकरणाकरिता गाव पातळीवर महिलांना मदत करणाऱ्या महिलांच्या सुख दुःखात व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पुरुषांचा जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड म्हणून सुधारक सन्मान या सन्मानाने गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बाल विकास विभागाच्या संगीता पाडवी मॅडम, मावीम नाशिक विभागीय सल्लागार शैलेश पाटील सर, मावीम धुळे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर सर, एकात्मिक बाल विकास विभागाचे मुकुंद पगारे सर, जिल्हा सनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील सर व कल्पतरू सीएमआरसी अध्यक्ष रेखाताई पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक प्रार्थना ग्रहण करण्यात आली. आलेला मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जगन्नाथ वानखेळकर सर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश पाटील सर यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाची
येणाऱ्या भविष्यात काय काय गोष्टी आपण करणार आहोत व त्याच्यासाठी आपण सुधारक सन्मान विजेत्यांचा आम्हाला कुठे कुठे मदत लागणार आहे याविषयी देखील सविस्तर असे मार्गदर्शन केले. सोबत एकात्मिक महिला बाल विकास विभागाच्या संगीता पाडवी मॅडम यांनी महिलांच्या संघटनात्मक कामाविषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाप्रसंगी सुधारक सन्मान पुरस्कार त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र टोपी व टी-शर्ट -शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. पुढील गावांचे विजेचे उपस्थित होते. दलवाडे, आरावे, साळवे, भडेने,
धमाने, कुरुकवाडे, हीसपूर, विरदेल, दसवेल, पडावद
इत्यादी गावातील मान्यवर उपस्थित होते. मागच्या आर्थिक वर्षात क्षेत्र कार्य दरम्यान तिरंगा थाळी कार्यक्रम दहा गावान मध्ये घेण्यात आला होता. त्यातील प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या महिलांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा सावंत, रत्ना पाटील, प्रियंका ठाकूर व अंश ब्राम्हणे यांनी मदत केले.