आशाताई बच्छाव
तीर्थक्षेत्र आळंदी जवळ कत्तलखाना कधीच होणार नाही–( उद्योगमंत्री उदय सामंत)
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
आळंदी– पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या प्रारुप सुधारीत विकास आराखड्यात मोशी डुडुळगाव सीमेवर श्री क्षेत्र आळंदी पासून हाकेच्या अंतरावर चार एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने समस्त हिंदूत्ववादी संघटना व वारकरी संप्रदायामध्ये तीव्र संतपाची लाट उसळली आहे, ही भावना उदय सामंत यांना समजल्यावर त्यांनी सांगितलं होतं की याठिकाणी कत्तलखाना होणार आहे. यावेळी महंतांच्या साक्षीने सांगितलं की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जे आरक्षण आहे, ते आम्ही रद्द करू. कत्तलखाना इथे कधीच होणार नाही असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आळंदीत दिला.श्रीक्षेत्र आळंदी येथे ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चैतन्य महाराज देगलूरकर, शांतीब्रह्म मारोतीबाबा कुरेकर, संतवीर बंडातात्या कराडकर, खासदार राजाभाऊ वाजे, सत्कारमूर्ती महंत प्रमोद महाराज जगताप, मा.आ.गोरीराम पवार, अक्षय महाराज भोसले, पुरुषोत्तम महाराज पाटील, श्रीभाऊ महाराज परांडे, भागवत महाराज साळुंखे, उमेश महाराज बागडे, राहुल चव्हाण, अजित वडगावकर यांसह महानुभाव, महंत, वारकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.मराठी भाषेचा मंत्री झाल्यापासून सहा महिन्यांत मी तीन वेळा श्रीक्षेत्र आळंदीला आलो आहे. ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार, पुढच्या आठ तासांत ज्ञानेश्वरीची छपाई करण्याचा निर्णय घेतल्याचं मी नमूद केलं. इतर क्षेत्रांप्रमाणेच वारकरी पंथातही पद्म पुरस्कार दिला पाहिजे, असं मत व्यक्त करत, लवकरच गुरुवर्य शांतीब्रह्म मारोतीबाबा महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार मिळण्याची शिफारस करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.






