आशाताई बच्छाव
गजेंद्र लोखंडे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन भोकरदन फत्तेपुर रोड लगत लक्ष्मी माता मंदिरा जवळ गतिरोधक बसण्याची केली मागणी
भोकरदन पंचायत समिती ते फत्तेपुर हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण चा झाला असून या रस्त्याने जाणारे वाहन सुसाट वेगाने धावत असतात या रस्त्याच्या बाजूस लक्ष्मी माता मंदिर असून मंदिराच्या पाठीमागील बाजूस व पुढील बाजूस दोन रस्ते या रस्त्यास मिळतात व उत्तरेकडील एक रस्ता या ठिकाणी मिळतो या तिन्ही रस्त्याने येणारे नागरिक व वाहने ठिकाणाहून मिळतात या वाहनाची व फत्तेपुर ते भोकरदन जाणाऱ्या वाहनाची अपघात होण्याचे दाट शक्यता असून या ठिकाणी गतिरोधक बसण्यात यावे करिता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे गतिरोधक बसवल्यास अपघात होऊन जीवित हानी होणार नाही या रस्त्याने सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहने चालू च असते हा रस्ता जास्त प्रमाणात रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात सुसाट वेगाने धावणाऱ्या मोटरसायकली व इतर वाहनाची धक्का लागण्याची शक्यता असल्याने गतिरोधक बसवल्यास अपघात होणार नाही त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे माननीय उपअभियते सार्वजनिक बांधकाम यांनी या निवेदनाचा विचार करून तात्काळ या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे करिता विनंती केली आहे दोन-तीन दिवसांमध्ये गतिरोधक न बसवल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा सुद्धा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे यावेळी कार्यालयात निवेदन घेताना ए एस इंगळे मॅडम व बी एस पवार राजेंद्र पगारे उपस्थित होते निवेदन देताना युवा मराठाचे न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे






