Home नाशिक लासलगाव येथील महावीर विद्यालयाची मोक्षदा भंडारी नवोदय परिक्षेत पहिल्या यादीत

लासलगाव येथील महावीर विद्यालयाची मोक्षदा भंडारी नवोदय परिक्षेत पहिल्या यादीत

210

आशाताई बच्छाव

1001567479.jpg

लासलगाव येथील महावीर विद्यालयाची मोक्षदा भंडारी नवोदय परिक्षेत पहिल्या यादीत

खेडगाव नवोदय विद्यालय अकरावी प्रवेशासाठी तिसरा क्रमांक

दैनिक युवा मराठा
निफाड (नाशिक) प्रतिनिधी रामभाऊ आवारे

जिद्द, साहस ,चिकाटी व प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मोक्षदा मिलिंद भंडारी हिने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अकरावी परीक्षेच्या नवोदय परीक्षेत नवोदय विद्यालय खेडगाव येथील पहिल्या यादीत क्रमांक मिळविला असून तिने या यादीत आपला तिसरा क्रमांक घेऊन विद्यालयात प्रवेश मिळविला आहे. लहानपणापासूनच बुद्धिवान असलेली मोक्षदा अत्यंत साहसी, जिद्दी व मेहनती असल्याने खेडगाव येथील नवोदय विद्यालयात अकरावी प्रवेशासाठी त्यांनी भरपूर अभ्यास करून आपला प्रवेश निश्चित केला आहे. कुमारी मोक्षदा भंडारी हिने नवोदय परीक्षेत उज्वल हे संपादन करून खेडगाव विद्यालयात अकरावी प्रवेश मिळविल्याबद्दल ब्राह्मण संघटनेच्या वतीने तिचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले आहे. तसेच मैत्री ग्रुप अध्यक्ष व महिला मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष सौ स्मिता शेखर कुलकर्णी यांनी तिला भविष्यकाळासाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व तिचे तोंड भरून कौतुक केले आहे. शुभेच्छा देताना सौ स्मिताताई कुलकर्णी म्हणाल्या की, भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी तुला कठीण परिश्रमाची व मार्गदर्शनाची गरज असल्याने तुला हवे ते सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत ‌‌. तुझ्या यशात तुझ्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असून त्यांचेही कृपाशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी असल्याने निश्चितच भंडारी कुटुंबीयांचा नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
आत्तापर्यंत झालेल्या बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये तिला घवघवीत असे यश मिळत आलेले आहे या परीक्षेसाठी तिला पालक मिलिंद श्रीराम भंडारी व सौ प्राजक्ता मिलिंद भंडारी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिला मिळालेला या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.