Home उतर महाराष्ट्र साक्रीच्या छडवेलमधील सट्टामाफीया किशोर शिंदे, करतो पोलिसांच्या नाकावर टिच्चून जुगारातून गोरगरीबांचे घरे...

साक्रीच्या छडवेलमधील सट्टामाफीया किशोर शिंदे, करतो पोलिसांच्या नाकावर टिच्चून जुगारातून गोरगरीबांचे घरे बरबादीचे धंदे…!

473

आशाताई बच्छाव

1001566769.jpg

साक्रीच्या छडवेलमधील सट्टामाफीया किशोर शिंदे,
करतो पोलिसांच्या नाकावर टिच्चून जुगारातून गोरगरीबांचे घरे बरबादीचे धंदे…!
मालेगाव, (कार्यालयीन प्रतिनिधी)- अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे.सर्वत्र अनितीने पैसे कमविण्याचा साधा सरळ फंडा उदयास येत चालला आहे.कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा मिळविण्यासाठी गोरगरीबांच्या सुखी संसाराची बरबादी व राखरांगोळी करण्यासही हे अवैध धंद्यात ले माफीया मागेपुढे पहात नाहीत.अगदी पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे असले अवैध धंदे राजरोसपणे बिनबोभाट सुरू असतात.त्यात भरडले जातात फक्त गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक .
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या छडवेल या गावी गेल्या कित्येक दिवसांपासून किशोर शिंदे नामक व्यक्ती सट्टा मटका जुगार चालवून या भागातील गोरगरीब आदिवासी नागरिकांना उध्वस्त करीत आहे.मोलमजूरी करून कष्ट करणाऱ्या आदिवासी बांधवांना या सट्टा मटका जुगाराच्या नादी लावून त्यांचे संसार बरबादीचे मुख्य कारण शिंदे हा ठरत आहे.दरम्यान विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सट्टामाफीया किशोर शिंदेचा भाऊ पोलिस पाटील म्हणून कार्यरत असल्यामुळे शिंदेंच्या या अवैध सट्टा मटका बेंटींगच्या धंद्याला पोलिसांचे सुध्दा अभय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.तर निजामपूर पोलिस स्टेशनचे कर्तृत्ववान सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी या अवैध सट्टा मटका जुगार अड्डयाचा कायमस्वरूपी समूळ बिमोड करावा अशीच मागणी पुढे येत आहे.

Previous articleपत्रकार डॉ.अक्षय कहालकर यांना पत्रकारिता क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण
Next articleलासलगाव येथील महावीर विद्यालयाची मोक्षदा भंडारी नवोदय परिक्षेत पहिल्या यादीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.