आशाताई बच्छाव
वरुड बु.गावामध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक गावामध्ये शेतात मशागत करताना रोटावेटर चालवताना ट्रॅक्टरच्या टायर खाली आल्याने तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावात घडली आहे.गोपीनाथ उत्तम वाघ वय 28 असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे गोपीनाथ यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते.पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने कधीही पाऊस पडून पेरणी सुरू होऊ शकते या भीतीने गोपीनाथ या नातेवाईकाचे ट्रॅक्टर आणून नांगरणी केली स्वतः रोटावेटर चालवायला सुरुवात केली रोटावेटर सुरू असताना अचानक तोल जाऊन टायर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ट्रॅक्टर बंद करून गोपीनाथ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाश्चात आई एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.