Home बुलढाणा वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या कुऱ्हाडीवर ! – मनसेचा खळबळ जनक आरोप!...

वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या कुऱ्हाडीवर ! – मनसेचा खळबळ जनक आरोप! – कर्तव्यात -कसूर करणाऱ्या वनपाल खान व शिंदे यांचेवर कारवाई करण्याची मागणी!

81

आशाताई बच्छाव

1001566460.jpg

वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या कुऱ्हाडीवर ! – मनसेचा खळबळ जनक आरोप! – कर्तव्यात -कसूर करणाऱ्या वनपाल खान व शिंदे यांचेवर कारवाई करण्याची मागणी!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा चिखली तालुक्यात वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा मनसे कडून आरोप करण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
चिखली तालुक्यात दररोज शेकडो वृक्ष तोडुन चिखली शहरातील खबुतरे ले. आऊटच्या पाठीमागे, ग्रामिण रुग्णालय परीसर, सैलानी
नगरात तोडलेली लाकडे साठविली जात असुन सदर लाकडे वाळली की ते उचलुन त्या ठिकाणी पुन्हा नव्याने लाकडे साठविली जात आहे. सदर गंभीर विषयांकडे वन विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्षp असल्याचे दिसुन येत आहे. याबाबत चिखली येथील वनपाल खान यांचशी फोन वरुन संपर्क साधला असता त्यांनी कोणताही पंचनामा अथवा मोक्यावर पाहणी केली नाही. मात्र गत काही वेळातच त्या ठिकाणाहुन साठविलेली लाकडे दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आली त्यामुळे वनपाल यांनीच त्यांना सावध केल्याचा संशय आला होता त्यामुळे मनसेच्या वतीने यापूर्वी दिनांक २३ मे रोजी २०२५ बुलडाणा उप वनसंरक्षक, श्रीमती. सरोज गवस यांना निवेदन दिले होते व त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुरवठयामुळे वनविभागाचे कर्मचारी गजानन शिंदे यांनी नाममात्र मोक्यावर आले असता मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष लाकुड ठिय्याचे ठिकाणे त्यांना दर्शविली व त्यांना संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली मात्र त्यांनी थातुरमातुरपणे नाममात्र पाहणी केली असुन अवैध वृक्षतोड करणाऱ्या लाकुडतोड्यांवर मात्र कोणतीही कायदेशिर कारवाई केल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने दिनांक 2 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले असुन आपले स्तरावरुन संबंधीत लाकुडतोड्यांवर तात्काळ कायदेशिर कारवाई करुन त्यांना पाठीशी घालणाऱ्या वनपाल खान व गजानन शिंदे यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख उपस्थित होते.

Previous articleकोकणचे नेते कर्नल सुधीर सावंत यांचा स्वातंत्र्य कोकण अभियानाला जाहीर पाठिंबा.
Next articleगहाळ मोबाईल शोधण्याचा ‘संग्राम!’ – चिखलीत शोध बुलढाण्यात कधी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.