Home नाशिक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत...

नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत यांची निवड

141

आशाताई बच्छाव

1001561113.jpg

नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत यांची निवड
मालेगाव, प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर:- महिला व बालकांच्या जनकल्याणासाठी कार्यरत असलेल्या आणि पोलिस सुरक्षा व माहिती अधिकार कायदा संरक्षण वाढीसाठी सक्रीय असणाऱ्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी येथील आंशूराज राजेंद्र पाटील राऊत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या आंशूराज पाटील राऊत यांचे शिक्षण पदवी पर्यंत झालेले असून,जय शिवराय ग्रुप मालेगाव कॅम्प या सामाजिक व सेवाभावी प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांच्या फोरमच्या युवा संचालकपदी झालेल्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचे आंशूराज पाटील राऊत हे चिरंजीव आहेत.

Previous articleघरकुलाच्या मागणीसाठी  दिव्यांगांचा    महानगरपालिकेवर धडक मोर्चा  
Next articleनेवासाच्या धरतीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना पाच फुटाची जागा द्या अन्यथा उद्रेक सुभाष त्रिभुवन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.