आशाताई बच्छाव
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत देगलुर कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना गौरव”
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
छत्रपती संभाजीनगर, ३० मे २०२५ – छत्रपती संभाजीनगर विभागात दिनांक ०७ जानेवारी २०२५ ते ०२ मे २०२५ या कालावधीत राज्यशासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम” मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देगलुर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.
या शानदार कामगिरीबद्दल अनुप पाटील, उपविभागीय अधिकारी, देगलुर जि. नांदेड यांना छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समारंभात गौरविण्यात आले. विभागीय आयुक्त मा. दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करण्यात आली.
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम” अंतर्गत राज्यशासनाने विभागीय कार्यालयांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लोककल्याणकारी सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी हे अभियान राबविले होते. यामध्ये देगलुर कार्यालयाने सर्वोत्तम कार्यप्रदर्शन केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.






