Home उतर महाराष्ट्र कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका

87

आशाताई बच्छाव

1001547700.jpg

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी कारवाई करत सुटका केली. ही कारवाई रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कोतवाली पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेंडीगेट येथील कारी मस्जिद शेजारील एका पांढर्‍या रंगाच्या टेम्पोमध्ये जनावरे बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी बांधून ठेवली आहेत.
माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे उभा असलेला पांढर्‍या रंगाचा टेम्पो हा संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये ४५ हजार रूपये किंमतीची एक काळ्या रंगाची गाय आणि १५ हजार रूपये किंमतीची तीन काळे-पांढरे रंगाचे वासरे असा एकूण ६० हजार रूपये किंमतीचा गोवंशीय जनावरांचा माल आढळून आला. तसेच चार लाख ३० हजार रूपये किमतीचा टेम्पोसह एकुण चार लाख ९० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.