आशाताई बच्छाव
सुप्रीम कोर्ट दिल्लीच्या
“युवा मराठा न्यूज” कायदेशीर सल्लागारपदी अँड मनोज बारेला यांची नियुक्ती!
दिल्ली वृत्तसंस्था:- संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय व आघाडीवर असलेल्या “युवा मराठा न्यूज” या आँनलाईन वेब नेटवर्कच्या सुप्रीम कोर्टासाठी कायदेशीर सल्लागार पदावर अँड मनोज बारेला यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“युवा मराठा न्यूज” च्या मुंबई हायकोर्ट कायदेशीर सल्लागारपदी यापुर्वीच अँड प्रसाद सकपाळ तर नाशिक जिल्हा न्यायालयात कायदेशीर सल्लागारपदी अँड विनया नागरे, अँड पंकज गायकवाड हे काम पाहत आहेत त्याशिवाय मालेगाव न्यायालयात अँड सुरेश महाले हे “युवा मराठा न्यूज” चे कायदेशीर सल्लागार म्हणून काम सांभाळीत असल्याने, आता युवा मराठा न्यूज नेटवर्कचे एक भरभक्कम कायदेशीर सल्लागार म्हणून स्वतंत्र पँनल संपूर्ण देशात तयार झाले आहे.