Home पुणे राजगुरुनगर येथे कचरा मुक्ती मोहीम

राजगुरुनगर येथे कचरा मुक्ती मोहीम

343

आशाताई बच्छाव

1001535396.jpg

राजगुरुनगर येथे कचरा मुक्ती मोहीम

(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

पुणे-राजगुरुनगर येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली…
तसेच राजगुरुनगर मधील काही नागरिक राजगुरूनगर च्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला घरातील कचरा टाकत असतात असे कोणीही करू नये
त्यामुळे आज क्रीडा संकुल परिसरात जो नागरिकांनी कचरा टाकला होता तो उचलण्यासाठी राजगुरूनगर मधील राजगुरुनगर स्वच्छता मोहीम चे सदस्य व नगरपरिषद चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपरिषद चे कर्मचाऱ्यां चे खूप आभार आज ते लोक एव्हडा भयंकर दुर्गंधीत कचरा उचलून राजगुरूनगर स्वच्छता ठेवण्यात प्रयत्न करत असतात परंतु नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात त्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो

राजगुरुनगरमधील गावावर प्रेम असणाऱ्या काही नागरिकांनी कचरा मुक्ती मोहीम राजगुरुनगर मध्ये सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत नगरपरिषद सोबत संपर्कात राहून कचऱ्यासंदर्भात विविध उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न राजगुरुनगर प्रेमी नागरिकांमार्फत केला जात आहे.
त्यातीलच एक भाग म्हणून आज क्रीडा संकुल येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांसोबत जनजागृतीसाठी राजगुरूनगर स्वच्छता मोहीम चे सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांत खलाणे व त्यांच्या मित्र परिवाराने कचरा उचलण्याचे त्याठिकाणी काम केले व ते पूर्णत्वास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, कचरा गोळा करण्याचे साहित्य, हँडग्लोज, कचरागाडी, इत्यादी त्याठिकाणी उपलब्ध करण्यात आले.
तरी यापुढेही राजगुरूनगर मधील जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी या मोहिमेत पुढाकार घेऊन आपले शहर,गाव स्वच्छ करण्यासाठी सहभाग नोंदवावा ही अपेक्षा.
राजगुरुनगर शहरातील तमाम नागरिकांना एकच आव्हान आहे कोणीही रस्त्याच्या कडाला व इतर ठिकाणी कचरा टाकू नये आपल्यालाच पुढे पावसाळ्यात आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे त्यामुळे आपण सर्वांनी राजगुरुनगर स्वच्छता मोहीम या टीम सोबत आपण जुळून सहकार्य करावे व राजगुरुनगर शहर स्वच्छ व सुंदर बनवावे असे विनंती श्री शशिकांत खलाणे युवा नेतृत्व यांनी केली आहे

Previous articleशिंदखेडा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन
Next article…वासोळच्या कोलतीनदी काठी “सट्टा माफीयाची भलतीच दांडगी दमदाटी,देवळा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोजच कमावतो जुगारातून रग्गड नोटांची पेटी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.