Home जालना शेतकऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन मस्टर सुरू करा अन्यथा...

शेतकऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन मस्टर सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार

118

आशाताई बच्छाव

1001533825.jpg

शेतकऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
मस्टर सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार

भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे

भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून मागील त्याला सिंचन विहिरीचे काम सुरू केलेले आहे. मात्र रोजगार सेवक तांत्रिक सहाय्यक अधिकारी शेतकऱ्यांची मस्टर घेत नसल्याची तक्रार शेतकर्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याकडे निवेदनद्वारे केली. या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांनी विहिरीचे काम सुरू केले आहे मात्र मजुरीची रक्कम मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक अधिकारी कंत्राटी कर्मचारी शेतकऱ्यांची मस्टर घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान विलंब होत आहे.कर्मचारी शेतकऱ्यांना उडवा उडवी चे उत्तरे देत आहे येत्या तीन दिवसात मस्टर सुरू न केल्यास मंगळवारी बीडिओच्या दालनात ठिया आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी निवेदनार बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास जाधव शेतकरी जयवंत घोलप, सुधाकर गाडेकर, भागाजी गाडेकर,कैलास गाडेकर ,भानुदास जाधव ,अमोल गाडेकर ,आनंदा कानडे आदी उपस्थित होते.

Previous articleशेतकऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन मस्टर सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार
Next articleस्वच्छतेच्या कामाकडे वानखेड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.