Home उतर महाराष्ट्र राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार

राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार

214

आशाताई बच्छाव

1001531809.jpg

राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार

अहिल्यानगर, प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यातील राहुरी ते देवस्थान शनिशिंगणापूरला रेल्वे धावणार आहे. धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, निधीही मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली.
हा मार्ग २१.८४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूरला दिवसाला ३० हजार ते ४५ हजार भाविक ये-जा करतात. शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला आल्यानंतर भाविक हे शनिशिंगणापूरला जातात. शिर्डीपर्यंत रेल्वेची सुविधा आहे. मात्र, शनिशिंगणापूरला येण्यासाठी भाविकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे या भागात रेल्वे सुरू करण्याची जुनी मागणी होती. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होईल.

Previous articleशहीद जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
Next articleसोनई परिसरात तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.