Home उतर महाराष्ट्र साक्रीच्या टिटाणे गावात जलजीवनच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचा संशय

साक्रीच्या टिटाणे गावात जलजीवनच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचा संशय

277

आशाताई बच्छाव

1001530661.jpg

साक्री /धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ – जलजीवन मिशन योजनेत अनियमितता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या संकल्पनेतून आणि महत्वकांशी योजना हर जल हर घर नल या योजनेतून देशाच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी जनतेला शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातून देशात साकारलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र काही गावांमध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमित्ता आणि भ्रष्टाचाराच्या घाट चढताना दिसत आहेत याला ठेकेदार पुढारी आणि अधिकाऱ्यांची युती जबाबदार आहे. असेच काही चित्र पाहायला भेटत आहे. धुळे जिल्ह्यातील बऱ्याच तक्रारी या योजनेसंदर्भात झालेल्या आहेत. असाच प्रकार साक्री तालुक्यातील. टिटाणे या गावाच्या योजनेत झालेला आहे. प्रत्यक्ष इस्टिमेट आणि काम यात खूप मोठा फरक आढळून येत आहे. यासंदर्भातील तक्रार ग्रामपंचायतीचे नेते सुभाष माळचे यांनी वेळोवेळी ग्रामीण पुरवठा विभाग पंचायत समिती साक्री आणि उपअभियंता पंचायत समिती साक्री. प्रत्यक्ष भेटून या योजनेच्या कामासंदर्भात तक्रार केली वरिष्ठांकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. व कामात कुठलीही सुधारणा केलेली नाही. या योजनेत एकूण अंदाजीत रक्कम 359 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर असून टिटाणे ग्रामपंचायत पैकी तिसरे वसंत नगर आणि आंबेमोहोर या ग्रुप ग्रामपंचायतीला मंजूर आहे. या योजनेचा कार्यादेश 31.01.2023. आहे कामाची मुदत 12. महिने एवढी आहे. परंतु या योजनेचे काम आत्तापर्यंत 70 टक्के एवढे सुद्धा पूर्ण करण्यात आलेले नाही. झालेले काम अत्यंत निकृष्ट व अ समाधानकारक आहे. म्हणून सुभाष माळचे यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी घडवूनही कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. म्हणून सुभाष माळचे .यांनी साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ. यांना. संबंधित कामाचा इस्टिमेट आणि कामाची बिल एमबी. व झालेल्या कामाचे फोटो अर्जासोबत संबंधित वरिष्ठांना दिलेले आहेत . संपूर्ण कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार यांना. काम मुदतीत पूर्ण करून व चालवलेले निकृष्ट काम थांबून चांगल्या दर्जाचे काम ताबडतोब पूर्ण करून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा वा संबंधित ठेकेदार यांना योजना मार्गे लावावी अशी विनंती वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे व या मागण्या मान्य करून लवकरात लवकर कारवाई नाही झाल्यास साक्री पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असा इशारा ग्रामपंचायतचे नेते सुभाष माळचे यांनी दिला आहे . व या या प्रकरणातील सर्वस्व जबाबदारी वरिष्ठांची राहील असेही त्यांनी सांगितले. सीईओ जिल्हा परिषद धुळे. व साक्री पंचायत समिती गटविकास अधिकारी. हे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील व कारवाई करून न्याय देतील का?अशी आशा असल्याचे असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमाहोरा येथील सचिन चौधरी यांची आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ युथ अमेरिका या संस्थेच्या सहाय्यक उपाध्यक्षपदी नियुक्ती
Next articleचालतं-फिरतं हत्यार घेऊन धावताहेत बसेस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.