Home उतर महाराष्ट्र दोंडाईचात दुचाकी तिरंगा रॅलीचा उत्साह; (राष्ट्रप्रेमी,माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उस्फूर्त...

दोंडाईचात दुचाकी तिरंगा रॅलीचा उत्साह; (राष्ट्रप्रेमी,माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उस्फूर्त सहभाग). (ऑपरेशन शेंदूर च्या यशस्वीतेचा जल्लोष मोदी सरकारचे अभिनंदन)

159

आशाताई बच्छाव

1001527972.jpg

– दोंडाईचात दुचाकी तिरंगा रॅलीचा उत्साह; (राष्ट्रप्रेमी,माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उस्फूर्त सहभाग). (ऑपरेशन शेंदूर च्या यशस्वीतेचा जल्लोष मोदी सरकारचे अभिनंदन)

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

दोंडाईचाः जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा शहरात आज सकाळी दुचाकी तिरंगा रॅली काढण्यात T आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून न सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागांतून फिरली आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ समारोप करण्यात आला. रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळी चौक, वंजारी समाज भवन, आझाद चौक, महाराणा प्रताप पुतळा, रावळ गढी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शहीद ने अब्दुल हमीद चौक, राजपथ, स्टेशन भाग, आम आदमी चौक, जुगणु चौक असा होता. – रॅलीमध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे आणि माजी सैनिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. भारत

मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. रॅलीमध्ये सुभेदार नामदेव वाडीले, नायक सुभेदार जगन्नाथ बोरसे, हवालदार नरेंद्र भलकार, विनोद पवार, हवालदार साहेबराव पाटील, हवालदार एम. सी. पाटील, रवींद्र पाटील, शिपाई छगन गंगाराम पाटील, हवालदार सरोज पवार, हवालदार हितेंद्रसिंग गिरासे यांच्यासह अनेक माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त,

भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती नारायण पाटील, सरचिटणीस डी. एस. गिरासे, दीपक बागल, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक प्रवीण महाजन, विक्रम पाटील, विजय मराठे, हितेंद्र महाले, गिरासे, के. पी. गिरासे, संजय चंदने, मनोहर कापूरे, रावळ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आचल दलाल नव्या पोलिस अधीक्षक
Next articleसमुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ७० टक्के नौका करंजा, मोरा किनाऱ्यावर स्थिरावल्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.