Home जळगाव एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास चोपडा महाविद्यालयात मान्यता: अँड संदीप पाटील

एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास चोपडा महाविद्यालयात मान्यता: अँड संदीप पाटील

160

आशाताई बच्छाव

1001510035.jpg

एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास चोपडा महाविद्यालयात मान्यता: अँड संदीप पाटील

चोपडा जळगाव प्रतिनिधी :सुरेंद्र बाविस्कर

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय या नॅक द्वारे A+ ग्रेडने नामांकीत महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद,नवी दिल्ली (एआयसीटीई) यांचेकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.लवकरच महाराष्ट्र शासन व विद्यापीठाचे संलग्नीकरण प्राप्त होऊन या शैक्षणिक वर्षापासून चोपडा तालुका व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास प्रवेश उपलब्ध होतील.विद्यापीठ परिक्षेत्रात कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळणारे एकमेव महाविद्यालय असल्याने याचा मनस्वी आनंद होत आहे.दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ६०-६० विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करण्यात आलेली आहे.या सर्व अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील,सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,समन्वयक डॉ.शैलेश वाघ,उपप्राचार्य डॉ.के एन.सोनवणे,एमबीए/एमसीए अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ.अभिजीत साळुंखे,डॉ.दीनानाथ पाटील सर्व उपप्राचार्य,रजिस्ट्रार,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.अत्याधुनिक व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व वर्गासह महाविद्यालय परिसरात स्वतंत्र ५ मजली इमारत प्रस्तुत अभ्यासक्रमांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे.संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अभ्यासक्रमास मंजुरी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.प्रस्तुत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा.के.एन.सोनवणे,प्रा.आर.एम.बागुल,डॉ.ए.बी.सूर्यवंशी,समन्वयक डॉ.एस. ए.वाघ व रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी केले.

Previous articleघरकुलाच्या अडथळ्यावरून गजानन लहासे यांचा बावनबिर ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा इशारा..
Next articleभाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत कार्यकर्ते बापू खलाणेंची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.