Home उतर महाराष्ट्र उत्तरप्रदेश च्या आंतरराष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील शतक पार केलेले रक्तदान...

उत्तरप्रदेश च्या आंतरराष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील शतक पार केलेले रक्तदान वीर अभयकुमार तेलतुंबडे यांचा सन्मान

132

आशाताई बच्छाव

1001505373.jpg

उत्तरप्रदेश च्या आंतरराष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील शतक पार केलेले रक्तदान वीर अभयकुमार तेलतुंबडे यांचा सन्मान

माळवाडगाव / श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी: दुधीनगर, सोनभद्र, उत्तप्रदेश येथे आंतरराष्ट्रीय रक्तवीर व विरंगना यांचा सन्मान सोहळा पार पडला असून या सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील सुपुत्र शंभराहून अधिक रक्तदान केलेले रक्तवीर श्री.अभयकुमार तेलतुंबडे यांचा पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नुकताच जानेवारी मध्ये त्यांचा दरभंगा बिहार येथेही आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे ते साधारण 1990 पासून रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत. साईसेवा आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवाराच्या माध्यमातून ते काम करतात. आतापर्यंत त्यांनी 121 वेळा स्वतः रक्तदान केले आहे.कोरोना काळात तीनही लाटेत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सर्वतोपरी मदत तन मन धनाने स्वतः च्या वाहनाने घरचे जवळ येत नसतानाही रुग्णांना औषधउपचार मिळवून दिले,तसेच अवयव दान, देहादान,याच्या प्रचार प्रसाराच काम करतात, थलेसेमिया, सिकलसेल, या सारख्या गंभीर आजरासाठी ही ते काम करतात. रुग्णांना शासकीय मदत मिळवून देने तसेच गावोगावी रक्तदान शिबीरे घेणे, यासाठी जनजागृती करने या सारखे समाजउपयोगी योगदान करत आले आहेत
मुठेवाडगाव येथील रहिवाशी असलेले अभयकुमार तेलतुंबडे यांना आतापर्यंत कोटा (राजस्थान )भतींडा (पंजाब )अलिपूरद्वार (पश्चिम बंगाल ), दरभंगा (बिहार ) या चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे . आणि हा त्यांचा पाचवा राष्ट्रीय पुरस्कार आहे.आणि शंभरच्या वर ऑनलाईन पुरस्कार मिळाले आहेत संपूर्ण गावकरी व रक्तदान परिवाराच्या वतीने या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
यावेळी साईसेवा रक्तदान ग्रुपचे ज्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला असे श्री. अमोलभाऊ पावसे लोणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार भूपेश चोबे (सोनभद्र ), श्रवनसिंग गोंड कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत श्री. अमोल भाऊ पावसे, गोपालसिंग पुर्बा, विनोद राजपूत,दिपककुमार महाथा, महेश पाटीदार भानू सिंग चौहान, सोनू जसवानी खामगावचे गौ रक्षक सुरज यादव, यवतमाळ च्या रक्तविरंगना मनीषा तिरवणकर मिनू मोदी, तसेच नेपाळ भूतान सह संपूर्ण राज्यातून आलेले रक्तमित्र व रक्तदाते आदी हजर होते देशभरातून पंजाब, पश्चिम बंगाल. मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान दिल्ली, उत्तरांचाल महाराष्ट्र आसाम येथील रक्तदाते ही होते
आदी उपस्थित होत

Previous articleBREAKING भाजपचे नवे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे ! – घाटाखाली सचिन देशमुख -यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड !
Next articleब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश, गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.