Home बुलढाणा निव्वळ अफवा ! ‘त्या’ कारवर संशयीत ‘डेड बॉडी’ आहे म्हणे.. -निघाली हनुमानाची...

निव्वळ अफवा ! ‘त्या’ कारवर संशयीत ‘डेड बॉडी’ आहे म्हणे.. -निघाली हनुमानाची प्रतिकृती

73

आशाताई बच्छाव

1001505346.jpg

निव्वळ अफवा ! ‘त्या’ कारवर संशयीत ‘डेड बॉडी’ आहे म्हणे.. -निघाली हनुमानाची प्रतिकृती !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा रात्री एक पोस्ट व्हायरल झाली अन् अनेक संभ्रात पडले. बुलडाणा रेसिडेंसी समोर उभ्या इन्व्होवा कारच्या टपावर काही तरी प्रेता सारखे गुंडाळून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र ‘युवा मराठा ‘ने याची पुष्टी केल्याने आज छ. संभाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ड्रोनद्वारे आकाशात उंच उडणाऱ्या हनुमानाची प्रतिकृती काल रात्री आणण्यात आली होती. बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन रेसिडेंसी समोर उभी इनोव्हा कारच्या टपावर काही तरी गुंडाळून ठेवले होते. पाहिल्यावर असे वाटत होते की “डेड -बॉडी” आहे. संशयित वाटल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. लगेच बुलडाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी डीबी पथकाला पाठवले. गाडीच्या टपावर संशयित दिसणारी वस्तू “डेड-बॉडी” नसून “हनुमानजी का ड्रोन” आहे ही बाब समोर आली. राज्यात सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम बुलडाणा आ. संजय गायकवाड यांच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जातो. आज 14 मे ला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून त्यासाठी आ. संजय गायकवाड यांच्यावतीने बुलडाणा शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मिरवणुकीत हनुमानजी गगन भरारी घेऊन संपूर्ण मिरवणूकीचे “ड्रोन-शॉट” कॅपचर करणार आहे. जयंती उत्सवात आपली कला दाखवण्यासाठी छत्तीसगड येथुन काही कलाकारांना आ. संजय गायकवाड यांनी बोलविले असून त्यांनीच हा “हनुमानजी का ड्रोन” आपल्या सोबत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous articleप्रियकराने गळफास घेऊन संपविली प्रेम कहानी प्रेयसीच्या ९ नातेवाईकांवर गुन्हा !
Next articleBREAKING भाजपचे नवे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे ! – घाटाखाली सचिन देशमुख -यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.