Home नाशिक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित जाणता राजा मित्र मंडळा तर्फे उमराणे...

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित जाणता राजा मित्र मंडळा तर्फे उमराणे गावातील १०वी व १२वीच्या गुणवंत विध्यार्थीचा गौरव सोहाळा मोठ्या उत्साहात संपन्न

173

आशाताई बच्छाव

1001504859.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:– स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित जाणता राजा मित्र मंडळा तर्फे उमराणे गावातील १०वी व १२वीच्या गुणवंत विध्यार्थीचा गौरव सोहाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमता: उमराणे वतनाचे दैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात बाळा पवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद जमधाडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर उमराणे मावळ खो-यातील जनता उच्च माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे येथील १०वि व १२विचे गुणवंत विद्याथी अदिती देवरे, जाई मोरे, यामिनी सोनवणे, अंकिता देवरे, अक्षरा देवरे, सार्थक भामरे, अजिंक्य बागुल, हर्षाली देवरे, तेजश्री देवरे, मयुरी मोरे, सुभांगी देवरे आदी विद्यार्थ्यांचा हिरामण देवरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भुसार शेतमालाचे व्यापारी अशोक कर्नावट हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सोसायटीचे माजी चेअरमन नानाजी देवरे, विनोद पाटणी, भाऊसाहेब सोनवणे, निंबा देवरे, दत्ता जाधव, प्रकाश देवरे, पुंडलिक गायकवाड, राकेश देवरे, सचिन देवरे, माणिक देवरे, केदा देवरे, बळीराम पवार, अनिल जाधव उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या ३२ वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विषद केली.तसेच अध्यक्षीय भाषणात कर्नावट यांनी ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे उमराण्या वतना मध्ये जाणता राजा मित्र मंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी समाज हिताचे काम गेल्या ३१ वर्षापासून अखंडपणे सुरु असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.या मंडळाच्या कार्याचा आजच्या तरुणांनी आदर्श घ्यावा असे आव्हान कार्यक्रमा प्रसंगी केले.संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.आले.त्यानंतर

Previous articleलोकनाथ रायपुरे यांचा सामाजिक कार्याबद्दल बुद्ध पौर्णिमेला सत्कार कार्यक्रम संपन्न
Next article“राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचा यशदीप तेजोमय — दहावीतील घवघवीत निकालाने सर्वत्र गौरव”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.