आशाताई बच्छाव
देवळा.,भिला आहेर तालुका प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10वी केंद्र परीक्षेचा जनता विद्यालय मेशी या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून यात मुलींनीच बाजी मारली आहे.ईश्वरी राजेंद्र बोरसे ही94टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली.तर इतर गुणवंत असे, प्रतीक्षा शिरसाठ 92.80 द्वितीय, अक्षदा पगार 92. तृतीय , स्नेहल मोरे 91.60 चौथी ,तर ज्ञानेश्वरी शिरसाठ 91.20 टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.सर्व यशवंतांचे नासिक जिल्हा विधायक कार्य समितीचे अध्यक्ष ॲड विजय पाटील, गट शिक्षण अधिकारी सतिष बच्छाव,शाळा समितीचे अध्यक्ष केदा शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिला आहेर , सरपंच बापूसाहेब जाधव, उपसरपंच योगेश चव्हाण,प्राचार्य गोरख निकम, प्रा. नितीन अहिरे यांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशवंतांना,विलास महाले,राजेंद्र मोहन,राजेश निकम पोपट पगार यांचे मार्गदर्शन लाभले.






