आशाताई बच्छाव
दहावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (ता. १३) जाहीर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील ६६ हजार ८५८ परीक्षार्थींपैकी ६१ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला आहे. यंदाच्या वर्षीही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यात ८९.२९ टक्के मुले तर ९५.०३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
अहिल्यानगर तालुका ९३.०७, अकोले ९५.०५, जामखेड ९३.८१, कर्जत ९४.१८, कोपरगाव ९३.३७, नेवासा ८८.६४, पारनेर ९४.५४, पाथर्डी ८६.७७, राहाता ९०.९८, राहुरी ९१.९९, संगमनेर ९५.५६, शेवगाव ८०.६६, श्रीगोंदा ९५.०२, श्रीरामपूर ९०.३३.






