आशाताई बच्छाव
पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड (पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील) भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी केली आहे.






