आशाताई बच्छाव
१८ मे रोजी नाशिकमध्ये युनिटी फाउंडेशनचा भव्य मदर्स डे फॅशन शो
स्मिता गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती; आई-मुलगी आणि आई-मुलगा वॉक ठरणार खास आकर्षण
नाशिक, अँड विनया नागरे प्रतिनिधी –१८ मे २०२५ मातृत्वाच्या प्रेमळ बंधाची उजळणी करत, युनिटी फाउंडेशनतर्फे मदर्स डे निमित्त एक खास फॅशन शोचे आयोजन नाशिक शहरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आई-मुलगी आणि आई-मुलगा वॉक हे मुख्य आकर्षण असेल.
कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री स्मिता गोंदकर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या सहभागी मातांना सन्मानित करणार असून, मातृत्वाच्या सन्मानार्थ आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना अॅड. एकता कदम, संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, म्हणाल्या, “मातांच्या नात्यांना सन्मान देण्याचा आणि समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा आमचा उद्देश आहे. या फॅशन शोद्वारे मातांचे योगदान सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सर्वाणी कार्यक्रमा ला यावे अशी विनती
कार्यक्रम दिनांक: १८ मे २०२५
स्थळ: [यशवंत हॉल नादूर नाका नाशिक ]
वेळ: [१२ ते ५]
संपर्क:
युनिटी फाउंडेशन
फोन: [९४२०४०५२३०]