आशाताई बच्छाव
प्रतिनिधी इम्तियाज अत्तार नाशिक
शनिवार दिनांक 10/05/2025 रोजी भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
(ग्राहक संरक्षण) चे महत्वाचे प्रशिक्षण शिबीर राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्ल यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ. विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शना नुसार नुकतेच
त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील पावन भूमीत पार पडले.
महाराष्ट्र राज्य व जिल्हा कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
त्याच बरोबर ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे अधिकार तसेच संघटने चे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील योगदान व ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकी बद्दल पदाधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही व जागरूकता याबद्दल कायदेशीर मोलाचे मार्गदर्शन श्री.मिलिंद चुरी यांनी उपस्थिताना केले, तर श्री. निलेश भोईर व श्री.विनोद गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील समाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
. नवनियुक्त सर्व पदाधिकारी व संघटन सदस्य यांनी कार्यक्रमाला वेळेवर हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हाध्यक्ष श्री दिपक भंगाळे आणि नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री रघुनाथ उजे बाबा यांनी केले,
प्रस्ताविक श्री.गुरुनाथ निमणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.विजय म्हसदे यांनी केले.
या वेळी नवनियुक्त राज्य तथा जिल्हा पातळीवरच्या नियुक्त्या वरिष्ठांच्या हस्ते करण्यात आल्या,,
त्या पुढील प्रमाणे
1 महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
श्री गुरुनाथ निमने
2 महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
रफिक खान रशीद खान
3 महाराष्ट्र राज्य महासचिव
श्री बबनराव चव्हाण
4 महाराष्ट्र राज्य सचिव
श्री विजय म्हसदे
5 नाशिक जिल्हाध्यक्ष
श्री दिपक भंगाळे
6 नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
श्री रघुनाथ उजे
7 त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष
सौ विद्याताई दिपक भंगाळे
8 त्र्यंबकेश्वर उप तालुका अध्यक्ष
श्री अरुण बोडके
सदस्य
श्री योगेश दोंदे
सदस्य
श्री गोपाल पोटिंदे यांची मान्यवरांच्या हस्ते ओळख पत्र,नियुक्ती पत्र, सन्मानचिन्ह देऊन नियुक्ती करण्यात आली, आजच्या एकदिवसीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीरला नाशिक तथा त्र्यंबकेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थीत होते,






