Home जालना शिवसेना उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर १५ जुनपासून जाफराबाद ते जालना...

शिवसेना उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर १५ जुनपासून जाफराबाद ते जालना बस सेवा सुरु होणार

134

आशाताई बच्छाव

1001490663.jpg

शिवसेना उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश
अखेर १५ जुनपासून जाफराबाद ते जालना बस सेवा सुरु होणार
भोकरदन/जालना दि. ९(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-जाफराबाद ते जालना मार्गे माहोरा, बरंजळा
साबळे, नळणी बरड, नळणी चौफुली, समर्थनगर नळणी, जवखेडा ठोंबरे- केदारखेडा,
राजुर, जालना बससेवा सुरु करण्यात यावा ही मागणी भोकरदन शिवसेना
उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी मागील काही दिवसांपासून लावून धरली
होती. तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशाराही परिवहन महामंडळाला दिला
होता. याची दखल घेवून १५ जुनपासून बससेवा सुरु करणार असल्याचे पत्र
ठोंबरे यांना परिवहन मंडळाने दिले आहे. त्यामुळे अखेर अनेक महिन्यांपासून
करत असलेल्या पाठपुराव्याला आणि मागणीला यश आले आहे.
भोकरदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे
यांना परिवहन मंहामंडळ जालनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, -जाफराबाद
ते जालना मार्गे माहोरा, बरंजळा साबळे, नळणी बरड, नळणी चौफुली, समर्थनगर
नळणी, जवखेडा ठोंबरे- केदारखेडा, राजुर, जालना बससेवा सुरु करणे बाबत
कळविलेले आहे. तसेच बससेवा सुरु न केल्यास विभागीय कार्यालयासमोर आत्मदहन
करण्यात येईल असे आपणामार्फत कळविण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने रा.प.
महामंडळ जालना विभागाकडे बसेस तसेच चालक, वाहक यांची कमतरता असल्याने आपण
मागणी केल्याप्रमाणे बससेवा १५ जून पासून सुरु करण्यात येईल. त्यामुळे
आपले आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात यावा, असेही विभाग नियंत्र रा. प.
जालना यांनी कळविले आहे.

Previous articleवक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला
Next articleहिंदू क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.