Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर शहरात पाणी टंचाई भासू नये यासाठी भाजप प्रयत्नशील

श्रीरामपूर शहरात पाणी टंचाई भासू नये यासाठी भाजप प्रयत्नशील

114

आशाताई बच्छाव

1001488590.jpg

श्रीरामपूर शहरात पाणी टंचाई भासू नये यासाठी भाजप प्रयत्नशील

श्रीरामपूर/प्रतिनिधी दिपक कदम :– शहराच्या पाणी साठवण तलावात सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक तलावाला भगदाड पडल्याने तीन दिवसांच्या पाणीसाठ्याचा अपव्यय झाला. या प्रकारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना भाजपच्या माजी नगरसेवकांनी साठवण तलावावर जात पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी सांगितले की, “शहरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आवश्यकता पडल्यास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती करुन पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त रोटेशन सोडण्याची व्यवस्था केली जाईल. व श्रीरामपूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी शहरातील पाणीपुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी अरविंद मराठे, बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यकांत गवळी, पाणीपुरवठा तंत्रज्ञ नीलेश बकाल, भाजपचे शहर सरचिटणीस रवि पंडित, बाळासाहेब हरदास, विशाल रुपनर, राहुल पांढरे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे आदी उपस्थित होते.

Previous articleमंत्री नितेश राणे व इंद्रनील नाईक यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन
Next articleपाकिस्तानच्या झेंडा पायदळी तुडवत भाजपने केला जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.