आशाताई बच्छाव
जालना शहरातील घरफोडी करणारे 02 अट्टल गुन्हेगार जेरबंद करुन पोस्टे कदीम जालना यांनी कार्यवाही करत 05 गुन्हे उघडकीस व रु.1,41,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
जालना शहरात पोस्टे कदीम जालना हद्दीतील विदयुत कॉलनी येथील शिवप्रसाद काळे यांच्या घरी दिनांक 07/05/2025 रोजी ते घरी नसतांना तीन अनोळखी ईसमंनी तोंडाला रुमाल बांधून त्यांचे घरी प्रवेश करून अलमारी मधील सोन्या चांदीचे दागिने, नगदी रोख रक्कम असा 55,000/- हजार रुपयांचा माल घेऊन गेल्याने पोलीस ठाणे कदीम जालना येथे अनोळखी चोरट्यां विरुद्ध गुरन.171/2025 कलम 331(3)(4)BNS कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी या बाबत सूचना दिल्याने सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक 07/05/2025 रोजी स्थनिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा इसम नामे 1) तकदिरसिंग टिटुसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना याने त्याचे साथीदार नामे 1) अजय उर्फ भज्या साबळे वाल्मीक नगर, गांधीनगर जालना व 2) पवनसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना यांनी केले असल्याचे खात्री लायक माहिती मिळाल्याने वरील स्टॉप यांनी यातील अजय उर्फ भज्या साबळे रा. वाल्मीक नगर, गांधीनगर जालना व 2) पावनसिंग टाक रा. गुरुगोविंद नगर, यांना शिवाजी महाराज पुतळा जालना येथून ताब्यात घेऊन गून्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नमूद गुन्हा हा साथीदार नामे तकदीरसिंग टिटुसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना यांचे सह केल्याची कबुली दिली. सदर आरोपींना विश्वासात घेऊन अधिक ची विचारपूस करता अरोपितांनी पोस्टे तालुका जालना हद्दीतील खालील गुन्हे केल्याची कबुली दिली.
1) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं 317/2025 कलम 303(2) भान्यासं
2) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं 246/2025 कलम 331(4)305 (A) भान्यास व 3) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं 318/2025 कलम 331(3)331(4)305
4) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं 226/2025 कलम 331(4)305(A) भान्यासं
वरील गुन्ह्यातील दोन्ही आरोपी कडून सोने चांदी मोटरसायकल रोख रक्कम असा एकूण 1,41,600/- रुपयाचा मुद्देमाल वरील आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. वरील प्रमाणे एकूण 04 घरफोडी व 01 मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी कदीम जालना पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अधिक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनी योगेश उबाळे,पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, ईर्शाद पटेल, सतीश श्रीवास्तव, संदीप चिंचोले रमेश काळे यांनी केली आहे.