Home जालना जालना जिल्ह्यात पाच मे ते सात मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसा मुळे...

जालना जिल्ह्यात पाच मे ते सात मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसा मुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकाच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या खासदार कल्याण काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

123

आशाताई बच्छाव

1001482606.jpg

जालना जिल्ह्यात पाच मे ते सात मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसा मुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकाच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या खासदार कल्याण काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी- 5 मे ते 7 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे रब्बी हंगामात लागवड केलेली पिके गहू हरभरा मक्का व खरीप हंगामासाठी नव्यानेच केलेल्या मिरची रोपवाटिका व मिरची लागवड केलेल्या पिकाची व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतात गोठ्यावरील पत्रे व गावातील घरावरील पत्रे शेतात लावलेले शेड नेट व आंबा बागेतील आंब्याची पडझड अशा अनेक नुकसानी झालेल्या असून त्याचे तात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा करिता जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व राष्ट्रीय काँग्रेसचे इतर पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे पत्रात नमूद केले आहे की सदरील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा तसेच जालना नांदेड समृद्धी महामार्गात शंभर ते दीडशे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या असून त्या जमिनीबाबत शेतकऱ्यांच्या बऱ्याचश्या तक्रारी असून त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व उपोषणात बसलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडवण्यात याव्या अशी जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणजी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले जालना शहरा लगत जालना नांदेड समृद्धी महामार्ग ज्या जमिनी संपादित केल्या जात आहे त्या जमिनीत असणाऱ्या विहिरी झाडे बाग यांचे सुद्धा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा असे त्यांनी सांगितले आहे तसेच संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट त्यांना मिळावा बरेचसे शेतकऱ्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दर्शनास आल्यामुळे शंभर ते दीडशे शेतकरी जालना तालुक्यातील देव मूर्ती या ठिकाणी उपोषणात बसले आहे त्यांच्या उपोषणाकडे सुद्धा लक्ष देऊन त्यांच्या असलेल्या मागण्या काय असेल त्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या अशी सुद्धा खासदार कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जालना नांदेड समृद्धी महामार्ग मध्ये संपादित केलेल्या जात आहे त्यांच्या संपादित केलेल्या जमिनी बाबत शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट प्रमाणे भाव देऊन शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आशा आशया चे निवेदन जिल्हाधिकारी यांना खासदार कल्याण काळे यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार कैलास गोरंट्याल जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊजी देशमुख उपस्थित होते

Previous articleवैशाख पौर्णिमेला चिखली येथे बुद्ध मूर्ती व लुंबिनी बुद्धविहाराचे 12 मे ला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन
Next articleगुगुळवाड पाणी आंदोलन प्रश्न पेटणार?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.