Home बुलढाणा वादळी वाऱ्याचा पहिला फटका बुलढाणा शहरात !

वादळी वाऱ्याचा पहिला फटका बुलढाणा शहरात !

91

आशाताई बच्छाव

1001480934.jpg

वादळी वाऱ्याचा पहिला फटका बुलढाणा शहरात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शहरात आज अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. बसस्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीजवळील दोन उंच झाडे प्रचंड वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून पडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, या झाडांपैकी एक झाड थेट ऑफिस समोरील उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर कोसळले. कारचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने, कारमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टळली.