Home बुलढाणा EXCLUSIVE – नखगळतीचे ओरखडे कायम ! – केसगळती नंतर नखगळतीचे 75 रुग्ण...

EXCLUSIVE – नखगळतीचे ओरखडे कायम ! – केसगळती नंतर नखगळतीचे 75 रुग्ण बाधीत ! आयसीएमआर चा अहवाल लालफीतशाहीत अडकला

79

आशाताई बच्छाव

1001480889.jpg

EXCLUSIVE – नखगळतीचे ओरखडे कायम ! – केसगळती नंतर नखगळतीचे 75 रुग्ण बाधीत ! आयसीएमआर चा अहवाल लालफीतशाहीत अडकला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती व टक्कल या अनामिक व अजूनही पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या आजाराची दहशत कायम आहे. चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल लालफीतशाहीतच अडकला असून गुलदसत्यातच आहे. त्यातच नखगळतीच्या विचित्र आजाराने 75 रुग्ण बाधीत झाले मात्र त्यावर ठोस उपाययोजना वा उपचार करण्यात जिल्ह्याचीच नव्हे तर देशाची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे अस्वस्थ चित्र आहे.
शेगाव तालुक्यातील या अनामिक आजारा संदर्भात तत्पूर्वी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रर यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामागे दूषित पाणी व पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचा संशय आहे. दरम्यान आधीच्या केस गळती प्रकरणाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केसगळती प्रकरणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पथकाने प्रभावित गावांमध्ये तपासण्या केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नाही. असे असले तरी, सेलेनियमचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार बळवल्याचे सांगण्यात येते. खारपाणपट्ट्यातील काही भागांतील जमिनीत सेलेनियमचे प्रमाण अधिक असून, झिंकच्या प्रमाणात घट झाल्यामुळे केस व नख गळतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हात व पायांची नखे पोकळ होऊन गळून पडतात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रुग्णसंखेवर दृष्टीक्षेप
शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे 10, कालवड 19, कठोरा 13, मच्छिंद्रखेड 11, घूली 6, पळसखेड 5 तर इतर गावात किरकोळ रुग्ण मिळून एकूण रुग्ण संख्या 75 वर पोहोचली आहे.
घाबरू नका!
रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केला जात आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. – डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा साथरोग अधिकारी, बुलढाणा

Previous articleBREAKING – चिखलीत चाकू हल्ला – किरकोळ वादातून थरकाप !
Next articleट्रक-दुचाकी अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.