Home नांदेड देगलूर तालुक्यातील तमलूरचा सचिन वनंजे शूर पुत्र देशासाठी शहीद

देगलूर तालुक्यातील तमलूरचा सचिन वनंजे शूर पुत्र देशासाठी शहीद

184

आशाताई बच्छाव

1001478587.jpg

देगलूर तालुक्यातील तमलूरचा सचिन वनंजे शूर पुत्र देशासाठी शहीद

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड देगलूर -काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी आज देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दु:खद घटनेने संपूर्ण देगलूर तालुका शोकमग्न झाला आहे.

शहीद सचिन वनंजे हे लहानपणापासूनच राष्ट्रसेवेसाठी प्रेरित होते. देशभक्तीची ठिणगी त्यांच्या मनात लहान वयातच चेतली होती. त्यांनी भारतीय सैन्यदलात भरती होऊन अनेक वर्षे देशसेवा केली. कर्तव्यपरायणता आणि शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य गुण होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी, दोन भाऊ आणि आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्याग आणि बलिदान हेच खरे शौर्याचे प्रतीक असते.
सचिन वनंजे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशासाठी अजरामर इतिहास लिहिला. त्यांचे नाव आणि त्यांचे शौर्य कधीही विसरले जाणार नाही. तमलूर गावाचा हा वीरपुत्र कायमच्या स्मृतीत राहील.

Previous articleचौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय
Next articleभोकरदन शहरामध्ये सकाळच्या वेळी आकाशात ढगांची गर्दी आमचे रिपोर्टर गजेंद्र लोखंडे यांनी टिपलेलं छायाचित्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.