Home उतर महाराष्ट्र शहाजीराजे छत्रपती शिवरायांचे महागुरू विश्वास पाटील : दहातोंडे यांच्या चांदे गावाला भेट

शहाजीराजे छत्रपती शिवरायांचे महागुरू विश्वास पाटील : दहातोंडे यांच्या चांदे गावाला भेट

98

आशाताई बच्छाव

1001475464.jpg

शहाजीराजे छत्रपती शिवरायांचे महागुरू
विश्वास पाटील : दहातोंडे यांच्या चांदे गावाला भेट       अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

स्वराज्यासाठी
अलौकीक कार्य करुन राज्य, देश आणि जगात ख्याती निर्माण करुन ज्यांचा इतिहास आज प्रेरणास्रोत ठरत आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे महागुरू शहाजीराजे होते. कार्याची कार्यसिद्धी करण्यात चांदे (ता. नेवासे) येथील सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे अनमोल योगदान होते, असे प्रतिपादन छावा व पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
इतिहास अहिल्यानगर जिल्ह्याचा” याकरीता लेखक पाटील यांनी मागील महिन्यात खेडलेपरमानंद येथील शिवभारतकार परमानंद महाराज मठास भेट दिल्यानंतर त्यांनी चांद गावात येऊन सरसेनापती दहातोंडे यांचा
पदस्पर्श लाभलेल्या पुरातन वास्तूंना भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली. पूर्वीच्या “तळ” भागातील जगदंबादेवी मंदिराच्या सभामंडपात ते बोलत होते. सरसेनापती दहातोंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दहातोंडे यांनी इतिहासाचे पाने उलगडत माहिती दिली. यावेळी साहित्यिक व उद्योजक एन. बी. धुमाळ, अरुण प्रल्हाद दहातोंडे, संजय भगत, पोपट
शिवाजी दहातोंडे, अरुण पोपट दहातोंडे, बाबासाहेब दहातोंडे, संभाजी शिंदे, पप्पू दहातोंडे उपस्थित होते.
लेखक पाटील यांनी गावातील पुरातन बारव, जुने वाडे, मंदिर तसेच इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या ठिकाणी भेट देऊन सरसेनापती यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. नव्याने तयार करण्यात आलेल्या गाववेशीला
भेट देऊन त्यांनी सोमेश्वर मंदिर व कृष्णदास लोहिया समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
वयोवृद्धांच्या भेटी घेऊन त्यांनी जुन्या आठवणी जाणून घेतल्या. येथील पुरातन वास्तूचे संवर्धन करुन इतिहास जागृत ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी जाता जाता व्यक्त केली. ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

Previous articleअहिल्यानगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के
Next articleसुपर आठचा  कालपासून धमाका सुरू 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.