Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के

अहिल्यानगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के

56

आशाताई बच्छाव

1001475459.jpg

अहिल्यानगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के                                                              अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज (ता. ५) जाहीर झाला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात बारावीची परीक्षा दिलेल्या ६० हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. यात ८१.४१ मुले तर ९२.५१ मुली उत्तीर्ण झाल्या. यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारली. जामखेड तालुक्यातून सर्वाधिक तर नेवासा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
अहिल्यानगर ८५.९३ टक्के, अकोले ८८.४२, जामखेड ९४.८९, कर्जत ८७.१५, कोपरगाव ८८.२२, नेवासा ७७.३१, पारनेर ८६.२१, पाथर्डी ८२.२९, राहाता ८९.८२, राहुरी ८६.५५, संगमनेर ९३.७०, शेवगाव ७६.६३, श्रीगोंदा ८८.५९ टक्के व श्रीरामपूर ८५.५१ टक्के निकाल लागला आहे.

Previous articleगडचिरोली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्र व डम्पिंग यार्डची पाहणी
Next articleशहाजीराजे छत्रपती शिवरायांचे महागुरू विश्वास पाटील : दहातोंडे यांच्या चांदे गावाला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.