Home उतर महाराष्ट्र दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतःआणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय, असे...

दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतःआणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय, असे प्रतिपादन सुप्रिया निमिष लोहाळे यांनी केले.

116

आशाताई बच्छाव

1001475439.jpg

श्रीरामपूर दिपक कदम- दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतःआणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय, असे प्रतिपादन सुप्रिया निमिष लोहाळे यांनी केले.

आहिल्यानगर येथील उपदेशक साप्ताहिक आणि- गोंधवणी येथील सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकतेच ख्रिस्ती वधू,वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून सिने दिग्दर्शक,मालिका दिग्दर्शक, लेखक निमिष लोहाळे लाभले होते.तर प्रमुख मार्गदर्शिका सुप्रिया निमिष लोहाळे उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात अतिशय मौलिक विचार मांडून,इच्छुक वधू-वर व पालकांना संबोधित केले.दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह असल्याचे सांगितले.

प्रारंभी साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह.डेव्हिड मेश्रामकर उपस्थित होते. तर संगीता गोडे, ॲड. प्रदिप सिंग,अविनाश काळे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चचे सचिव उदयसेन राठोड,डी. जे.भांबळ,

विजया जाधव,संतोष सगळगिळे, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, सुभाष खरात, राजेश कर्डक, पीटर बनकर, अरुण मोहन, मोजेस चक्रनारायण, दिपक कदम, अमोल कदम, अजितकुमार सुडगे यांची उपस्थिती होती.

या उपक्रमासाठी विकास प्रभुणे, मिलिंद ठोकळ, बाळासाहेब कसबे,मकरंद चांदेकर,कार्तिकी चांदेकर, कविता गायकवाड, अनिल दुशिंग, मयूर अमोलिक, निखिल चांदेकर, सनी साळवे, जॉनी दिवे, यश पारखे, स्तवन प्रभूणे, प्रेम ठोकळ, राज ठोकळ, आंद्रेस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, शेवगाव आदी ठिकाणाहून वधू, वर पालकांची उपस्थिती होती.

याप्रसंगी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वीततेसाठी चर्च सचिव उदयसेन राठोड, सौरभ जाधव, रूपाली जाधव, ॲड.प्रदिप सिंग यांचे सहकार्य लाभले. राजेश्वर पारखे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रकाश लोखंडे यांनी आभार मानले. चर्चचे प्रमुख आचार्य रेव्ह.अनिल वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश काळे यांचा मोलाचा वाटा होता.

Previous articleहवामान  खात्याचा इशारा .
Next articleखेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ – बिहार पहिला दिवस : बिहारमध्ये खेळांची रंगतदार सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.