Home जालना IPS रॅंक प्राप्त आकाश गोरे यांच्या हस्ते जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक...

IPS रॅंक प्राप्त आकाश गोरे यांच्या हस्ते जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण संपन्न.

46
0

आशाताई बच्छाव

1001465122.jpg

IPS रॅंक प्राप्त आकाश गोरे यांच्या हस्ते जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 02/5/2025
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 01 मे रोजी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुरी ता. जि.जालना येथे भाटेपुरी येथील UPSC मध्ये आयपीएस रँक प्राप्त आकाश गंगाराम गोरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी शिक्षण मंडळ खणेपुरीचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. श्री देविदास राव खारतुडे मामा यांनी भूषविले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे यांनी UPSCमध्ये आयपीएस रँक प्राप्त डॉ. आकाश पुंजाराम गोरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे सर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम व मेहनतीचे महत्त्व पटवून देऊन यशाला शॉर्टकट नसतो तसे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं तर आयपीएस डॉ. आकाश गोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवून स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी पहावीत असे प्रतिपादन करून यशाचे रहस्य सांगितले.
याप्रसंगी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक श्री आर .ए. आटोळे, श्री शिवाजी माळशिखरे, श्री आर.पी. काळे, श्री आर .डी .जाधव, श्री जी. एस. लोखंडे, श्री एस. एस. पवार, श्री एच. एन. मोरे, श्री आर. ए. पाटील, श्री ए. पी. गावडे, श्री जी. के. तायडे, श्रीमती आटोळे मॅडम ,श्रीमती शेजवळ मॅडम ,श्रीमती रायपुरे मॅडम ,श्रीमती साठेवाड मॅडम ,श्री ए. एस. खटके, श्री डी. गाढे हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर.बी.जाधव यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जी. एस. लोखंडे यांनी केले.

Previous articleनम्रता वृद्धाश्रम वर्धापन व महाराष्ट्र दिन महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे घोटी गोरेगाव येथे युट्युब न्यूज चैनल चे उद्घाटन
Next article52 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पंकज वानखेडे यांचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here