आशाताई बच्छाव
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विहिरीचे भूमिपूजन करताना नंदा गजेंद्र लोखंडे. व इतर
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील सौ नंदा गजेंद्र लोखंडे यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माघेल त्याला विहीर माघेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत विहिरीला मंजुरी मिळाली असून त्या विहिरीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला दिगंबर पाटील लोखंडे सेवा निवृत्त ग्रामसेवक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले श्री परमेश्वर पाटील लोखंडे यांच्या हस्ते पाच विकास मारून या शुभ मुहूर्तावर काम करण्यास सुरुवात केली गणेश काका लोखंडे माजी सरपंच यांनी सुद्धा येथे भूमिपूजन करून पाच टीकास मारून पुढील खोदकाम करण्यास शुभेच्छा दिल्या तसेच माझी अर्धांगिनी माझे चिरंजीव माझी कन्या माझे मित्र सलीम खा पठाण शिवानंद माझे बंधू गणेश सदाशिव लोखंडे आम्ही सर्वांनी आज या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन केली व सर्वांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या भूमिपूजन सोहळ्याला आमचे लोकप्रतिनिधी व वडीलधारी मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल नंदा गजेंद्र लोखंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केल भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.






