Home बुलढाणा EXCLUSIVE भूतदया ! जंगलात पाण्यासाठी ‘लॉकडाऊन ?’ पण वर्धमान मामा आले धावून...

EXCLUSIVE भूतदया ! जंगलात पाण्यासाठी ‘लॉकडाऊन ?’ पण वर्धमान मामा आले धावून !

111

आशाताई बच्छाव

1001457834.jpg

EXCLUSIVE भूतदया ! जंगलात पाण्यासाठी ‘लॉकडाऊन ?’ पण वर्धमान मामा आले धावून !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा उन्हाळ्याची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पक्षी व वन्य प्राण्यांना तीव्र तृष्णातृप्तीचा सामना करावा लागत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास कोणी तयार दिसत नाही. परंतु काही प्राणीप्रेमींची भुतदया प्रशंसनिय ठरतेय! असेच बुलढाण्यातील वर्धमान चव्हाण मामा हे मलकापूर रोडवरील संकट मोचन मंदिर परिसरात वन्य प्राण्यांची तहान भागविणारे अवलिया ठरले आहेत.
खळखळणारे नदी नाले, पाण्याने तुडूंब भरलेले डोह, किलबिल करणारे पक्षी, अशा वृक्षवल्ली मध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असे दृश्य आता जंगल परिसरामध्ये पाहिला मिळत नाही. कारण निसर्गातील जीवन म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा पाणी नावाचा घटक असल्याने जंगलात पाण्यासाठी जणू काही लॉकडाऊन सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे.

उन्हाळ्यात वन विभागाकडून वन्य प्राण्याचे पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दृष्य आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढला असून वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता वन विभागाने पानवठ्यात पाणी सोडावे अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.
अशात
प्राणीमात्रांवर दया करा हे आपण नेहमीच एकतो. मात्र प्रत्यक्षात मदत करणारे थोडेच असतात. परंतु बुलढाण्यातील 65 वर्षाचे वर्धमान चव्हाण हे 4 ते 5 कॅन संकट मोचन हनुमान मंदिर येथे छोट्या सिमेंटी पाणवठ्यात सकाळी 7 ते 8 वाजता पाणी उपलब्ध करून देतात. स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देणारे वर्धमान चव्हाण यांची ही भूतदया प्रेरणादायी आहे.

Previous articleसाकोली येथील बस व्यवस्थापक आगारप्रमुख सचिन आगरकर यांची
Next articleस्पेशल रिपोर्ट… आज भेंडवडची घटमांडणी ! – भेंडवडची भविष्यवाणी नेमकी कशी करतात? त्यामध्ये खरंच किती तथ्यं आहे?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.