Home जालना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेले असून...

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेले असून पाण्यावाचून गाव तहानलेले दीपक जाधव व संदीप शिरसाट यांचे गटविकास अधिकारी यांना पत्र

294

आशाताई बच्छाव

1001452924.jpg

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेले असून पाण्यावाचून गाव तहानलेले दीपक जाधव व संदीप शिरसाट यांचे गटविकास अधिकारी यांना पत्र
युवा मराठा नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे हे गाव या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत विहीर व गावापर्यंत पाईपलाईनचे काम झालेले असून गावामध्ये कोणतीही पाईपलाईन अद्याप पर्यंत झालेले नसून गावातील नागरी पाण्यासाठी वन वन भटकत आहे असे निवेदनात नमूद केले आहे दीपक जाधव व संदीप शिरसाठ हे भारतीय दलित पॅंथर चे अध्यक्ष व सचिव असून हे वारोवार पळसखेडा पिंपळे येथील ग्रामसेवक तसेच कॉन्टॅक्टर व इंजिनिअर यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कोणताही अधिकारी फोन उचलण्यास तयार नाही जल जीवन त्यांचा निधी प्राप्त होऊन सुद्धा गावामध्ये पाईपलाईन टाकलेली नाही जुन्याच पाईपलाईन द्वारे एक महिना अगोदर पाणी सोडले असेल पण आता एक महिन्यापासून पाणी उपलब्ध झालेले नाही जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये पाईपलाईन करणे आवश्यक असताना ती सुद्धा अद्याप पर्यंत टाकलेली नाही एक महिन्यापासून गावाला पाणी मिळत नाही बाणेगाव ते पळसखेडा पिंपळे अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेले असताना गावला पाणी मिळाला पाहिजे असताना सुद्धा मिळत नाही याकडे सरपंच ग्रामसेवक यांचे सुद्धा लक्ष नाही पळसखेडा पिंपळे गावातील दलित वस्ती मध्ये कुठे पाण्याची सेवा उपलब्ध नाही किंवा पाणी आणण्यासाठी आजू बाजूला विहीर उपलब्ध नाही त्यामुळे दलित वस्तीच्या महिला व नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे असे त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे गावाला येत्या एक ते दोन दिवसां मध्ये पाणी न मिळाल्यास दिनांक 2/ 5/ 2025 पासून पळसखेडा या गावी पाण्याच्या टाकीखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे प्रशासनाने या निवेदनाचा तात्काळ विचार करावा व पळसखेडा पिंपळे गावाला त्वरित पाणीपुरवठा करावा उपोषणकर्त्यास काही इजा झाल्यास जीवितहानी झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे