Home जालना नरेश वाढेकर संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित.

नरेश वाढेकर संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित.

291

आशाताई बच्छाव

1001448182.jpg

नरेश वाढेकर संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/05/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
छत्रपती संभाजी नगर येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विभागीय मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक 23 रोजी संत एकनाथ महाराज रंग मंदिर छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी प्रहारचे जालना तालुका अध्यक्ष नरेश सुभाषराव वाढेकर यांना संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रहार चे जालना तालुकाध्यक्ष नरेश वाडेकर यांनी गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी, कामगार, दिव्यांग, शेतमजूर, कामगार, यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचा जालना जिल्ह्यात अनेक गावात शाखा स्थापन करून गाव तिथे शाखा घर तिथे प्रहार सैनिक निर्माण करण्यासाठी आणि जालना जिल्ह्यात प्रहारचा विस्तार करण्याचा तालुकाध्यक्ष नरेश वाडेकर यांनी सतत प्रयत्न केला त्यांच्या सामाजिक राजकीय कामाचा विचार करत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी जालना तालुका अध्यक्ष नरेश वाडेकर यांचा संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराने गौरव केला यावेळी पुरस्काराला उत्तर देताना नरेश वाडेकर यांनी प्रहार परिवाराचे आभार व्यक्त करून मी माझ्या 9 वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, शेतमजूर ,कामगार यांच्या केलेल्या कामाची शाब्बासकी म्हणून हा पुरस्कार गौरव माझा एकट्याचा नसून जालना जिल्ह्यातील प्रत्येक प्रहार सैनिकाचा हा पक्षप्रमुख यांनी केलेला सन्मान असल्याचे नरेश वाडेकर यांनी सांगितले आणि हा पुरस्कार जालना प्रहार सैनिकांना अर्पण करीत असल्या चे यावेळी नरेश वाडेकर यांनी सांगितले.