Home वाशिम कायमस्वरूपी दारुबंदीसाठी मालेगाव पोलिसांना मुंगळा ग्रामस्थांचे निवेदन

कायमस्वरूपी दारुबंदीसाठी मालेगाव पोलिसांना मुंगळा ग्रामस्थांचे निवेदन

610

आशाताई बच्छाव

1001444892.jpg

वाशिम (गोपाल तिवारी)
वाशिम जिल्ह्यातील तसेच मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील नागरिक कायमस्वरूपी दारूबंदी करिता उपोषणाला बसणार…
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंगळा गावातील ग्रामस्थ दारू विक्रीमुळे त्रस्त झालेले आहेत. वेळोवेळी मागणी करूनही फक्त थातूरमातूर कारवाई कारवाई केल्या जाते. 30 एप्रिल पर्यंत शंभर टक्के दारूबंदी करण्यात यावी व मुंगळा बीट मधील कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी आज निवेदनातून दिली आहे. मालेगाव पोलीस ठाण्याचे फौजदार संजय चौधरी यांना निवेदन देताना संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे कार्यकर्ते व संयोजक अनंता दौलत कुटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मालेगाव पोलीस यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे मुंगळा वासी यांचे लक्ष लागले आहे.

Previous articleपहलगाम घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन
Next articleजेवळी बसवरत्न पुरस्कार 2025 चे मानांकन जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.